Maharashtra सामाजिक

डॉ.निनाद दोशी यांच्याकडे फलटण डॉक्टर्स असोसिएशनची धुरा; वार्षिक सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.निनाद दोशी; नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

डॉ.निनाद दोशी यांच्याकडे फलटण डॉक्टर्स असोसिएशनची धुरा; वार्षिक सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत डॉ. निनाद दोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ. चेतन गुंदेचा, डॉ. शिल्पा गांधी, डॉ. निखिल गांधी आणि डॉ. सागर तेली यांचीही प्रमुखपदांवर निवड झाली

फलटण | ज्ञानप्रवाह न्यूज : फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत डॉ. निनाद दोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली.

फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीत डॉ.चेतन गुंदेचा यांची उपाध्यक्ष, डॉ.शिल्पा गांधी यांची महिला उपाध्यक्ष, डॉ. निखिल गांधी यांची सचिव आणि डॉ.सागर तेली यांची खजिनदारपदी निवड झाली.

फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ.बी. के.यादव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. निनाद दोशी आणि नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ.निनाद दोशी हे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या निवडीचे विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केले.लायन्स उप प्रांतपाल मंगेश दोशी, जैन सोशल गुप अध्यक्ष श्रीपाल जैन, लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरिअर्स चे व दिगंबर जैन जागरण युवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.निनाद दोशी यांनी असोसिएशनने दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.