Maharashtra

जैनवाडी येथे मुनीश्री गुणसागरजी व विराटसागरजी महाराजांच्या सान्निध्यात जैनोदय चातुर्मासाची सुरुवात;भाविकांना धर्मलाभाचे आवाहन

पंढरपूरच्या जैनवाडीत 6 ऑगस्टपासून जैनोदय चातुर्मास 2026 शुभारंभ; कलश स्थापना,कल्याण मंदिर विधान व प्रवचन सोहळा

जैनवाडी येथे मुनीश्री गुणसागरजी व विराटसागरजी महाराजांच्या सान्निध्यात जैनोदय चातुर्मासाची सुरुवात; भाविकांना धर्मलाभाचे आवाहन

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथे 6 ऑगस्ट 2026 रोजी जैनोदय चातुर्मास 2026 चा शुभारंभ होत असून कलश स्थापना, कल्याण मंदिर विधान, महाराजांचा आहार, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जैनवाडी ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : आगम चक्रवर्ती आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने तसेच मुनीश्री 108 गुणसागरजी महाराज आणि मुनीश्री 108 विराटसागरजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात जैनोदय चातुर्मास कलश स्थापना 2026 चा शुभारंभ गुरुवार, 6 ऑगस्ट 2026 रोजी जैनवाडी ता. पंढरपूर, जि.सोलापूर येथे भक्तिमय वातावरणात होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महाराजांच्या आहाराने होईल.त्यानंतर सकाळी 10.30 वाजल्यापासून कल्याण मंदिर विधान सुरू करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता कलश सवाल होऊन त्यानंतर कलश स्थापना संपन्न होईल. यानंतर उपस्थित भाविकांना महाराजांचे मार्गदर्शन व प्रवचनाचा लाभ मिळणार आहे.

कल्याण मंदिर विधानात सहभागी होणाऱ्या श्रावक-श्राविकांनी अष्टद्रव्याचे साहित्य सोबत आणावे, असे आयोजक अध्यक्ष विजयकुमार मेंडेगिरी, उपाध्यक्षः स्वप्निल दानोळे,कोषाध्यक्ष कांतीलाल हातगिने यांनी आवाहन केले आहे.तसेच नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांनी बाहेरगावी असलेल्या भाविकांनीही जैनवाडीत उपस्थित राहून धर्मलाभ व पुण्यसंचय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांसाठी सकाळी नाश्ता व दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.सर्व धार्मिक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडणार असून अधिकाधिक जैन बांधवांनी सहभागी होऊन चातुर्मास महोत्सव यशस्वी करावा,असे आवाहन जैनोदय चातुर्मास समितीने केले आहे.

या चातुर्मास कलश स्थापनेसाठी श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट,जैनवाडी श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, जैनवाडी मिरजे मळा,वीर सेवा दल जैनवाडी,वीर महिला मंडळ जैनवाडी ,समस्त दिगंबर जैन समाज जैनवाडी, जैनोदय पावन वर्षायोग समिती २०२६ जैनवाडी,
आचार्य शांतीसागर पाठशाला जैनवाडी आदींसह अक्षय वठारे, योगेश सदलगे,वैभव दानोळे, नितीन कोल्हापुरे,प्रविण दानोळे आणि ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.