Maharashtra Politics

स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगाव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान शिबीर संपन्न

कासेगावात स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणार्थ आरोग्य शिबीर;मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा शेकडो रुग्णांना लाभ

पांडुरंग परिवार व प्रणव परिचारक युवा मंचचा स्तुत्य उपक्रम:कासेगाव PHC मध्ये सर्व रोग तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद

कासेगाव येथे स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर संपन्न

कासेगाव | ज्ञानप्रवाह न्यूज | शुभम लिगाडे : जनसामान्यांचे नेते माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त कासेगाव ता.पंढरपूर येथे सामाजिक बांधिलकीतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हे शिबीर पार पडले.

या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन गरजू रुग्णांवर लेन्ससहित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले.

यासोबतच सर्व प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करून रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार देण्यात आले.ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

                मान्यवरांची उपस्थिती

या समाजोपयोगी उपक्रमाप्रसंगी युवा नेते प्रणव परिचारक,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख,गोपाळपूरचे सरपंच दिलीप गुरव,भाजप पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के सर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हरिभाऊ फुगारे,पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत देशमुख,डॉ अरुण मेनकुदळे,बाळासाहेब शेख यांच्यासह कासेगाव ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.