Maharashtra सामाजिक

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेला मोठे बळ,बुलढाणा अर्बन बँकेकडून १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेला बळ; १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेला बळ; बुलढाणा अर्बन बँकेकडून सीएसआर निधीतून १० लाखांचे अत्याधुनिक सीसीटीव्ही साहित्य देणगी

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था; १५ पीटीझेड कॅमेऱ्यांसह १० लाखांची देणगी

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ : भाविकांची सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पंढरपूर शाखेच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला सुमारे १० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले. मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी याबाबत माहिती दिली.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची सुरक्षितता, मंदिर परिसरातील विविध हालचालींवर प्रभावी देखरेख आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण लक्षात घेऊन बुलढाणा अर्बन बँकेच्या सीएसआर निधीतून हे सीसीटीव्ही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या देणगीमध्ये १५ पीटीझेड कॅमेरे (५ मेगापिक्सेल, ३६X झूम), १५ नग ४ टीबी इंटरनल हार्ड डिस्क, ८ नग १ टीबी एक्स्टर्नल हार्ड डिस्क, ५ बंडल लॅन केबल आणि ६५ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.

या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच मंदिरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रभावी देखरेख ठेवणे आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना अधिक कार्यक्षमपणे राबविणे शक्य होणार आहे.

यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे विनोदी भंडारी,सुनील जी. चांडक,विलास कंकाळ,गोविंद माधवराव कदम आणि रमेश जगदाळे उपस्थित होते.मंदिर समितीच्यावतीने लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.