लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श प्रेरणादायी – डॉ.नीलम गोऱ्हे
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रकार्याचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक संघर्षाचा आदर्श प्रेरणादायी – डॉ.नीलम गोऱ्हे
टिळकांच्या स्वराज्य विचारांपासून अण्णाभाऊंच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यापर्यंत; डॉ.नीलम गोऱ्हेंचे प्रेरणादायी अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. टिळकांच्या राष्ट्रकार्याचा आणि अण्णाभाऊंच्या सामाजिक न्यायाच्या संघर्षाचा आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ ऑगस्ट २०२६ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथी निमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही महापुरुषांना भावपूर्ण अभिवादन केले.
डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार देत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया रचला. पुण्याच्या भूमीतून त्यांनी राष्ट्रीय चळवळीला दिशा दिली.गीतारहस्यसारखा ग्रंथ तुरुंगवासात लिहित देशकार्य,धर्मकार्य आणि समाजजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले.त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याला आजही देश कृतज्ञतेने स्मरतो.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आवाज दिला. सामाजिक न्याय,समता आणि स्वाभिमानाच्या लढ्यासाठी त्यांनी केलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांनाही आदरांजली वाहिली.
यावेळी लोकमान्य टिळक स्मृती कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने प्रदान करण्यात येणारा पुरस्कार हा देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव असल्याचेही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.












Add Comment