Maharashtra Politics

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटरमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया

जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रा तील ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना जलदूत बनून सहभागी होण्याचे आवाहन.

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर!२१ ऑगस्टला महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत जलसंधारणासाठी नागरिकांची पावले

जलदूत बनून पाण्यासाठी चालूया’; मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन

मुंबई,दि.१८ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी जलसंधारणाच्या जनचळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा केला जातो.

यंदा जलसंधारण दिनाचे औचित्य साधून २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

युवा पिढीसाठी रील्स स्पर्धा

जलसंधारणाचा संदेश आधुनिक माध्यमातून युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

क्यूआर कोडद्वारे सहभाग नोंदवा

महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर या राज्यव्यापी अभियानात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जलसंधारण ही लोकचळवळ

जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकार होणारी लोकचळवळ आहे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.