Maharashtra Politics

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरणा निमित्त विधायक उपक्रम;भैरवनाथवाडी – नारायण चिंचोलीत भावपूर्ण अभिवादन

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून नेत्याचे स्मरण केवळ शब्दांत नव्हे तर समाजोपयोगी कार्यातून करण्याचा संदेश देण्यात आला

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त भैरवनाथवाडी व नारायण चिंचोलीत हरिभजन, प्रतिमापूजन, वृक्षारोपण आणि प्रसाद वाटपातून भावपूर्ण आदरांजली

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्त पंढरपूर तालुक्यात विधायक उपक्रम; भैरवनाथवाडी-नारायण चिंचोलीत भावपूर्ण अभिवादन

हरिभजन, वृक्षारोपण अन् समाजोपयोगी उपक्रमांतून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतींना उजाळा

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : राज्याच्या राजकारणात संततुत्य आणि जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारे स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वातून अनेक संस्थांचा उदय आणि विकास झाला. हजारो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तर शेतकऱ्यांच्या जीवनमानातही मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण ठेवत भैरवनाथवाडी आणि नारायण चिंचोली येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भैरवनाथवाडीत हरिभजनातून कर्मयोगींना अभिवादन

पुण्यस्मरण दिनानिमित्त भैरवनाथवाडी येथे सर्वप्रथम हरिभजनाचे आयोजन करण्यात आले.भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

यानंतर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण

कर्मयोगींच्या विचारांची जोपासना आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी परिसरात सुपंत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. भैरवनाथ भजनी मंडळ, अण्णा हजारे आणि तात्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सामाजिक कार्यासोबत पर्यावरण संवर्धनाची जोड देत पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

नारायण चिंचोलीत प्रतिमापूजन आणि प्रसाद वाटप

नारायण चिंचोली येथील वीर भगतसिंग सार्वजनिक वाचनालयातही स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाच्या वतीने त्यांच्या कार्याची आठवण करून देत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून नारायण चिंचोली येथे प्रसादाचे वाटप करण्यात आले. समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून कर्मयोगींचे स्मरण करणे हाच या कार्यक्रमा मागील प्रमुख उद्देश होता.

या वेळी लक्ष्मण तात्या धनवडे, लक्ष्मण कोल्हे माजी सरपंच, गहिनीनाथ चव्हाण उपसरपंच, विष्णुपंत माने माजी चेअरमन, ज्ञानेश्वर बरडे चेअरमन, दत्तात्रेय मस्के सर अध्यक्ष सूर्यनारायण मंदिर समिती, पोपट पाटील माजी सरपंच, विजय कोळेकर, बळवंत धनवडे माजी सरपंच, हरिभाऊ माने, बापूराव कोले, लहू दादा नलवडे, दादा सोनवर, पांडुरंग घाडगे, दादा मामा डुबल, अण्णा हजारे, दादा जानकर, श्रीधर कोळेकर, बापू कोळेकर, मुकुंद घाडगे, दत्ता बनसोडे, सचिन भडकवाड, दीपक गुंड, विनोद कोळेकर, शिवाजी भोसले, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर वाघमोडे, पांडुरंग पांढरे, डॉ. आनंद गाजरे, डॉ. महादेव सरडे, भाऊसाहेब माने, सिद्धेश्वर सुरवसे, रमेश कोले, आप्पा महाडिक, नारायण गुंड, भास्कर भोसले, सचिन गुंडगे, अनिल देशमुख, बापू वसेकर, तुकाराम कोळी, महेश आप्पा माने, अण्णा बरडे, तसेच नारायण चिंचोली-भैरवनाथवाडी भजनी मंडळाचे बाळू वसेकर, कल्याण मामा डुबल, हनुमंत घाडगे, विनय सरवदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.