पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने ए आय कार्यशाळा उत्साहात संपन्न
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने AI कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातील सुमारे 150 फोटोग्राफरांनी कार्यशाळेचा लाभ घेतला
AI टेक्नॉलॉजीने फोटोग्राफी व्यवसायाला मिळणार नवी दिशा; पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचचा उपक्रम
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्यावतीने ए आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ए आय टेक्नॉलॉजी ही काळाची गरज ओळखून पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचने ही कार्यशाळा आयोजित केली होती याचा लाभ जिल्हाभरातील जवळपास दीडशे फोटोग्राफर बांधवांनी घेतला.

या कार्यशाळेमुळे फोटोग्राफर बांधवांच्या व्यवसायाला गती मिळेल अशी भावना उपस्थित फोटोग्राफर बांधवांनी बोलून दाखवली व विकास मंचचे आभार मानले.
या कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य सन आर्ट स्टुडिओ सांगली,बालाजी मीडिया ईश्वरपूर व महाराष्ट्र राज्य फोटोग्राफी असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष अतुल कौलवार हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सन आर्ट चे संचालक शरद सारडा, श्रीकांत बाहेती, बालाजी मीडियाचे संस्थापक श्रीराम जाधव, के राज स्टुडिओचे राजेश कटकधोंड,बालाजी नवले, अंकुश कंगले, प्रदिप ननवरे विकास मंचचे श्रीकांत लव्हेकर,विनायक देवकर यांच्यासह जिल्हाभरातील फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद गदगे,लाला काका खिस्ते, पांडुरंग तरळगट्टी, विलास साळुंखे संजय गुरव, प्रविण पुकाळे,आसिफ शेख,लखन शेख,अमोल कवठाळकर,राहुल वाघमारे, श्रीनिवास बोधे,अली तांबोळी, सुनील झरकर आदींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर विकास मंचचे बशीर शेख यांनी केले. आभार संतोष चव्हाण यांनी मानले.












Add Comment