विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी त्यांचा सन्मान केला.
पंढरपुरात राहुल नार्वेकरांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन; मान्यवरांची उपस्थिती
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज, दि,21 :- राज्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे,माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील,प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे,मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम,स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी रोंगे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.














Add Comment