india Politics

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमशक्तीमुळे केंद्रात मंत्रीपदापर्यंत पोहोचलो – ना.रामदास आठवले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमशक्तीमुळे केंद्रात मंत्रीपदापर्यंत पोहोचलो – रामदास आठवले

रामदास आठवले यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाची दशकपूर्ती; कॅबिनेट मंत्रीपदासाठी आठवले यांची मागणी

रामदास आठवले यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या दशकपूर्तीनिमित्त मुंबईत भव्य सत्कार;डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भीमशक्ती, महायुती आणि कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर आठवले यांचे भाष्य

मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 15 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी तुमच्यापुढे आज उभा नसतो.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे आणि आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे मी केंद्रीय मंत्रीपदाच्या तख्तापर्यंत पोहचु शकलो अशी कृतज्ञ भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या दशक पुर्तीनिमीत्त आयोजित सत्काराला उत्तर देतांना ना.रामदास आठवले बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे,आमदार प्रविण दरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते ना.रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन काण्यात आले होते. सुत्रसंचालन रिपाइंचे मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक पवार यांनी केले.

यावेळी सौ.सिमाताई आठवले, कुमार जीत आठवले, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; संजय सिन्हा,एम.एस.नंदा,पुण्याचे उपमहापौर पुरुषोत्तम वाडेकर,पप्पु कागदे,काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारसिंग,श्रीकांत भालेराव, दयाल बहादुर, सोहेल शेख, कृष्णमिलन शुक्ला, विलास तायडे, अनिलभाई गांगुर्डे, घनश्याम चिरणकर, बाळासाहेब गरुड, प्रकाश खंडागळे, संजय पवार, रमेश गायकवाड, अजित रणदिवे, प्रकाश जाधव, संजय डोळसे, अमित तांबे, किसन रोकडे, आशा लांडगे, अभयाताई सोनवणे, उषाताई रामलु, शिलाताई गांगुर्डे, नैना वैराट,स्वप्नाली जाधव,प्रभावती रणदिवे,सचिन मोहिते, सचिन कासारे, विनोद जाधव, प्रल्हाद जाधव, नरेंद्र गायकवाड, भास्कर वाघमारे, सुरेश जाधव, संजय सोनवणे, सुनिल साळवे, रवि गायकवाड, रमेश अण्णा मुळे, संजय भिडे, बाळासाहेब मिरजे आदि मान्यवर उपस्थित होते.

राजकारणात मला अनेक आंबेडकरी चळवळीतल्या विचारवंतानी पत्रकारांनी सल्ला दिला होता आणि त्यानुसार मी राजकारणात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात शिवसेना भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला .मी शिवसेना भाजपबरोबर युती केल्यामुळे युतीची महायुती झाली. शिवशक्ती भिमशक्ती भाजप महायुती प्रचंड यशस्वी झाली.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आशिर्वाद आणि आंबेडकरी भिमशक्तीने मी केंद्रात केंद्रीय पदापर्यंत पोहचु शकलो. गेली 10 वर्ष केंद्रात राज्यमंत्री आहे. आता माझे प्रमोशन झाले पाहिजे.केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद रिपब्लिकन पक्षाला मिळाले पाहिजे या मागणीकडे ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.

2019 च्या निवडणुकांत घोषणा होती देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र त्यावेळी मी म्हणत होतो देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि तुमच्यात मी केंद्र अशी चारोळी ना. रामदास आठवले यांनी ऐकवली.

महाराष्ट सरकारने महिलांना लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देण्याची योजना आखली. ती यशस्वी झाली. मी यापूर्वीच मागणी केल्याप्रमाणे महिलांना लाडकी बहिण योजनेद्वारे दरमहा 2100 रुपये देण्याचे माझी मागणी राज्य सरकारने मंजुर करावी असे ना. रामदास आठवले म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी माझे संबंध चांगले तर कॉग्रेसच्या राहुल गांधी सोबत माझे संबंध चांगले नाहीत असा टोला ना. रामदास आठवले यांनी यावेळी लगावला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाला 12 वर्ष झाली. माझ्या राज्यमंत्री पदाला 10 वर्ष झाली. याच्यापुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 15 वर्षाची कारकिर्द पुर्ण होईल आणि माझी 13 वर्षाची होईल. 2029 मध्ये पुन्हा महायुतीचीच सरकार येईल. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात एनडीएचेच सरकार येईल. केंद्रात मी पुन्हा 5 वर्षासाठी केंद्रात राज्यमंत्री होईल आणि पुढची 10 वर्ष केंद्रात मंत्री राहीन.कोणी आम्हाला हलवु शकत नाही असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महायुतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी आठवलेंनी जोडले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ना. रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची 10 वर्ष पूर्ण केली. पुढची 10 वर्षही केंद्रीय राज्यमंत्री पदावर ना. रामदास आठवले कायम राहतील. त्यांची इच्छा निश्चितच पूर्ण होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ना. रामदास आठवले यांनी दलित पँथरच्या काळात गावोगावी पोहचुन आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड संघर्ष केला. संघर्षातुन ते पुढे आले. मात्र संघर्षातुन जरी ते पुढे आले असले तरी त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दलही कटुता नाही. कोणत्या पक्षाबद्दल कोणत्या जातीबद्दल, कोणत्या व्यक्तीबद्दल कधीच त्यांनी कटुता बाळगली नाही. ते नेहमीच सर्वांशी सुसंवाद साधत राहिले. महायुतीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडण्याचे काम रामदास आठवले यांनी केले.त्यामुळे ते केंद्रात मंत्री बनु शकले. ते पुढचीही 10 वर्ष केंद्रात मंत्री राहतील अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांना दिल्या. सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून रामदास आठवले म्हणजे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांचा गौरव केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कविता

आठवले साहेब आजची उत्सव मुर्ती
साजरी करुया त्यांची दशकपुर्ती
संघर्षातुन तयार झाले त्यांचे नेतृत्व
मोदी सरकारमध्ये दिसते त्यांचे कर्तुत्व
आठवलेसाहेबांचे दिलखुलास व्यक्तीत्व
सर्वांनाच आवडते त्यांचे खुमासदार वक्तृत्व
कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ
पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ
ज्यांनी दिल्लीमध्ये सामान फेकले
साहेबांनी त्यांच्या सत्तेचे त्याठिकाणी गाठोडेच बांधले
आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र
दोस्तीचे आणि प्रेमाचे पसरवतात इत्र
भगवान बुध्दांचे खरे अनुयायी
बाबासाहेबांचे सच्चे शिष्य
म्हणुन त्यांचे उज्वल आहे भविष्य
भविष्यात पुर्ण होवोत तुमच्या सर्वच इच्छा
जन्मभर तुमचीच साथ लाभो हीच सदिच्छा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आठवले खरे अनुयायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रभावी नेतृत्व असल्याचे गौरवोद्‌गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आठवले यांनी गेली दहा वर्षे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

एकनाथ शिंदेची चारोळी
आपको मिलती रहेगी मंत्रीपद की गद्दी, क्योंकि आपके साथ हैं नरेंद्र मोदी, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले, आठवले यांनी केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून देशभर ठसा उमटवला आहे. विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली असून वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, सलग दहा वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात प्रभावीपणे कार्य करणे ही मोठी कामगिरी असून समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरीब घटकांचा विश्वास संपादन करण्यात आठवले यशस्वी ठरले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगलीच्या क्रांतीभूमीतून घडलेला रामदास आठवले यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले.. आंबेडकरी विचार आणि सामाजिक समतेचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, आठवले हे आंबेडकरी चळवळीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि जनसामान्यांशी नाळ जुळलेले नेतृत्व होय. दलित पँथर चळवळीपासून लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून, देशभरातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे ते खरे जननेते आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.