उमरखेड : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीकडून, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसने जिल्हा शिस्तपालन समितीची घोषणा केली आहे. या त्रिसदस्सीय समितीमध्ये, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार कीर्तीबाबू गांधी अध्यक्ष तर उमरखेड काँग्रेसचा निष्ठावान, मुरब्बी राजकारणी व शिस्तप्रिय चेहरा म्हणून ओळखले जाणारे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल व यवतमाळ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्यावर पक्षाने महत्त्वपूर्ण धुरा सोपविल्याने, पक्षातील शिस्त आणखी मजबूत होणार असल्याची चर्चा आहे .
जिल्हा कार्यकारिणीच्या २९ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ही समिती गठित करण्यात आली. नव्या समितीच्या अध्यक्षपदी मा आ किर्तीबाबू गांधी यांची नियुक्ती करण्यात आली तर उमरखेड कांग्रेसचे जेष्ठ व अनुभवी नेते नंदकिशोर अग्रवाल आणि टिकाराम कोंगरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या त्रिसदस्यीय समितीवर, जिल्हा काँग्रेसमधील संघटनात्मक शिस्त अधिक बळकट करणे, पक्षांतर्गत शिस्त राखणे आणि संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे. या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, जिल्हा शिस्तपालन समिती तात्काळ प्रभावाने कार्यान्वित करण्यात आली आहे. पक्षातील अतिशय पक्षनिष्ठ व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने सवत्र कौतुक होत आहे.











Add Comment