मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त KGN ग्रुपचा सेवाभावी उपक्रम; रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पंढरपूरमध्ये KGN ग्रुपच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात KGN ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवता, बंधुत्व आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर नागरिकांना आवश्यक औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून मानवसेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना मदत होऊ शकते, त्यामुळे अधिकाधिक युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मोहम्मद पैगंबर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हाजी आबिद भाई बेळगावकर, युवा नेते प्रणव परिचारक, इमरान मणेरी, पत्रकार अभिराज उबाळे, इस्माईल बोहरी, इंजिनिअर आसिफ शेख, आरोग्य अधिकारी डॉ.सलीम मुलाणी, रियाज तांबोळी, शफीभाई मुलाणी, समाजसेवक गणेश साळुंखे, मुसा तांबोळी, शकील मुल्ला, सद्दाम तांबोळी, फारुख मणेरी, यासीन तांबोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि KGN ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजात एकता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश पोहोचतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी KGN ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराचे आयोजन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले.












Add Comment