Maharashtra

सोन्याचा मुकुट,लक्ष्मीहार अन् मोहरांची माळ… नागपंचमीला श्री रुक्मिणी मातेचे अलौकिक रूप

नागपंचमीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, कंबरपट्ट्यासह पारंपरिक अलंकारांचा साज

नागपंचमीनिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक सुवर्णालंकारांचा साज; मनोहारी रूप पाहून भाविक भारावले


सोन्याचा मुकुट,लक्ष्मीहार अन् मोहरांची माळ… नागपंचमीला श्री रुक्मिणी मातेचे अलौकिक रूप

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ ऑगस्ट २०२६ : नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री रुक्मिणी मातेला आकर्षक व पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले. विविध दागिन्यांनी नटलेल्या श्री रुक्मिणी मातेचे मनोहारी रूप भाविकांसाठी भक्तीचा आणि श्रद्धेचा विशेष अनुभव ठरले.

नागपंचमीच्या धार्मिक परंपरेनुसार श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पद्धतीने अलंकार परिधान करण्यात आले. यामध्ये सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कंबरपट्टा आदी अलंकारांचा समावेश आहे.

पारंपरिक दागिन्यांनी सजलेले श्री रुक्मिणी मातेचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नागपंचमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

याबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी माहिती दिली.

नागपंचमीला पारंपरिक अलंकारांचा साज

नागपंचमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे.पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असून विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पद्धतीने अलंकार परिधान केले जातात.

यंदाच्या नागपंचमीच्या निमित्ताने करण्यात आलेली ही विशेष सजावट भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.