Maharashtra सामाजिक

राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढारकीत ४१ जणांचे रक्तदान; ग्रामीण भागातून सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश

राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढारकीत ४१ जणांचे रक्तदान; ग्रामीण भागातून सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश

पंढरपूर तालुक्यातील कोंढारकीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ४१ रक्तदात्यांचा सहभाग

पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले. तृप्तीताई खरे यांच्या हस्ते उद्घाटन, वृक्षारोपण, खाऊ वाटप आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी तृप्तीताई खरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातून अशा प्रकारचे रक्तदान उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.राजेंद्र फुगारे यांनी अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून समाजासाठी आदर्श निर्माण केला असून हा उपक्रम ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी राजेंद्र फुगारे यांनी तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.जीवनात समाजाचे देणे फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपा, व्यसनांपासून दूर राहा, आई-वडिलांचा सन्मान करा आणि चांगले संस्कार जपा,असा संदेश त्यांनी युवकांना दिला.

रक्तदान शिबिराबरोबरच कोंढारकी येथील अंगणवाडीस भेट देऊन शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसा निमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे, नेहरू युवा मंडळाचे राहुल नागणे, विनोद पाटील, उमेश दांडगे, विश्वनाथ पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिकारी सोमनाथ देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील तसेच नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा सामाजिक उपक्रम ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा उपक्रम म्हणून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.