india महत्वाची बातमी

स्वरा भास्कर यांना हिंदु विधीज्ञ परिषदेची कायदेशीर नोटीस; जोहार वरील वक्तव्यावर २५ लाखांची नुकसान भरपाई मागितली

स्वरा भास्कर यांना हिंदु विधीज्ञ परिषदेची कायदेशीर नोटीस; जोहारवरील वक्तव्यावर २५ लाखांची नुकसानभरपाई मागितली

जोहार ला भित्रेपणा म्हटल्याचा आरोप;स्वरा भास्कर यांच्या विरोधात ७ दिवसांची कायदेशीर नोटीस,माफीची मागणी

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,९ सप्टेंबर २०२६ : अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांनी राणी पद्मावती यांच्यासह हिंदू राजपूत स्त्रियांनी शीलरक्षणासाठी केलेल्या जोहार विषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून हिंदु विधीज्ञ परिषदेने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई तसेच भविष्यात हिंदू धर्म,परंपरा आणि ऐतिहासिक व्यक्तींबाबत अवमानकारक वक्तव्य न करण्याची लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंदू धर्मप्रेमी रमेश कडगले यांच्या सूचनेनुसार हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अनेश परळकर यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय ?

परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ३१ ऑगस्ट रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पद्मावती या हिंदी चित्रपटातील जोहार च्या प्रसंगाचे वर्णन करताना स्वरा भास्कर अहमद यांनी कथितरित्या आक्षेपार्ह विधान केले.या वक्तव्यामध्ये जोहार करणाऱ्या महिलांच्या कृतीला भित्रेपणाशी जोडल्याचा आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेने केला आहे.

या वक्तव्यामुळे महाराणी पद्मावती तसेच जोहार करणाऱ्या वीरांगनांचे शौर्य, त्याग आणि आत्मसन्मान यांचा अवमान झाल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. तसेच या वक्तव्यामुळे हिंदू आणि राजपूत समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याचेही परिषदेने म्हटले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही

नोटीसमध्ये भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी हे स्वातंत्र्य अमर्याद नसून कायद्यानुसार वाजवी निर्बंधांच्या अधीन असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.

परिषदेने संबंधित वक्तव्य मागे घेण्याची तसेच हिंदू समाज आणि विशेषतः राजपूत महिलांची सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी

स्वरा भास्कर अहमद यांनी त्यांच्या विविध सामाजिक माध्यमांवरील संबंधित व्हिडिओ,संदेश,रील्स, क्लिप्स आणि इतर संदर्भ तातडीने हटवावेत,अशी मागणीही नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

याशिवाय भविष्यात हिंदू धर्म, परंपरा आणि ऐतिहासिक महापुरुषांविषयी कोणतेही अवमानकारक वक्तव्य करणार नाही, याचे लेखी हमीपत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे.

७ दिवसांची मुदत; अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

नोटीसमध्ये या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.निर्धारित मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास स्वरा भास्कर अहमद यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्यासाठी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा अधिवक्ता अनेश परळकर यांनी दिला आहे.

स्वरा भास्कर यांच्या जोहार वरील कथित वक्तव्यावरून हिंदु विधीज्ञ परिषदेने कायदेशीर नोटीस पाठवली.२५ लाखांची नुकसान भरपाई,माफी आणि ७ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याची मागणी

ads

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.