india सामाजिक

तिरंग्याच्या सन्मानासाठी पंढरपूर एकवटले; विद्यार्थी,अधिकारी आणि नागरिकांचा भव्य पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग

हातात तिरंगा,मनात देशभक्ती! पंढरपुरात हर घर तिरंगा पदयात्रेने शहर दुमदुमले

पंढरपुरात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तालुका प्रशासनाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा उत्साहात पार पडली. विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी शहर दुमदुमले.

तिरंग्याच्या सन्मानासाठी पंढरपूर एकवटले; विद्यार्थी,अधिकारी आणि नागरिकांचा भव्य पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग

पंढरपुरात तिरंग्याच्या सन्मानासाठी नागरिकांचा महासागर;हर घर तिरंगा पदयात्रेत राष्ट्रभक्तीचा जयघोष

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : हातात तिरंगा आणि मनात देशभक्तीची भावना घेऊन पंढरपूरकरांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तालुका प्रशासना च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा पदयात्रेत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेने चौफाळा,नाथ चौक,तांबडा मारुती, महाद्वार, कालिका माता मंदिर, काळा मारुती मार्गे पुन्हा चौफाळा असा प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप केला.

तिरंग्याच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान आणि देशभक्तीची भावना दृढ करणे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे स्मरण करून देणे तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

या पदयात्रेत आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजीत पाटील,माजी आमदार प्रशांत परिचारक,प्रांताधिकारी सचिन इथापे, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे,तहसीलदार सचिन लंगुटे,भूमी अभिलेख उपअधीक्षक पूजा आवताडे, तालुका पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, मान्यवर पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.

तिरंगा हातात अन् देशभक्ती मनात, अशा उत्साही वातावरणात पार पडलेल्या या पदयात्रेने पंढरपूर शहरात राष्ट्रप्रेमाचा संदेश अधोरेखित केला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.