india

भारत अन् नेदरलँड्स लोकशाही बळकटीसाठी एकत्र; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची राजदूत मारिसा जेरार्ड्स यांच्याशी महत्त्वाची बैठक

निवडणूक व्यवस्थापन ते कर्मचारी प्रशिक्षण:भारत-नेदरलँड्स लोकशाही सहकार्याला नवी दिशा, ज्ञानेश कुमार यांची महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि नेदरलँड्सच्या राजदूत मारिसा जेरार्ड्स यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. निवडणूक व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण आणि लोकशाही सहकार्याला बळकटी देण्यावर या वेळी एकमत

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर लोकशाही मूल्यांची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी भारत आणि नेदरलँड्स यांनी एकत्र काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) तसेच ‘इंटरनॅशनल IDEA च्या सदस्य देशांच्या परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांनी नेदरलँड्सच्या भारतातील राजदूत महामहिम मारिसा जेरार्ड्स यांची आज नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली.

या उच्चस्तरीय बैठकीत उभय बाजूंनी लोकशाही सहकार्य अधिक बळकट करण्याच्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.विशेषतःआयआयसीडीईएम २०२६ (IICDEM 2026) परिषदेत आखण्यात आलेल्या दूरगामी दृष्टिकोनाला अनुसरून ही चर्चा पार पडली.

निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशिक्षणावर भर

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा मान असलेल्या भारताचा निवडणूक व्यवस्थापनातील दांडगा अनुभव आणि नेदरलँड्सची आधुनिक प्रशासकीय व्यवस्था यांचा समन्वय साधण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ करणे,आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना दर्जेदार व प्रगत प्रशिक्षण देणे आणि निवडणूक व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींची (Best Practices) देवाणघेवाण करणे या मुद्द्यांवर दोन्ही प्रतिनिधींमध्ये एकमत झाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे आयोजन करण्यासाठी दोन्ही देशांमधील ही भागीदारी भविष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.