Maharashtra crimes सोलापूर जिल्हा

भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात मोठी कारवाई; २३ आरोपी निष्पन्न,१० जणांना अटक

भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात मोठी कारवाई; २३ आरोपी निष्पन्न, १० जणांना अटक

मनोहर भोसले प्रकरणाचा आर्थिक तपास वेगाने; दोन आरोपी अटकेत, रामदास झोळ चा शोध सुरू

भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई.अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून राजेंद्र हुंबे व लक्ष्मीकांत लिगाडे अटकेत; २३ आरोपी निष्पन्न,१० जणांना अटक.

सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ : सोलापूर ग्रामीण पोलीस पथकाने कामगिरी करून भोंदुबाबा मनोहर मामा भोसले याचे अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावणारा रामदास झोळ व त्याचे इतर साथिदार आरोपी व सहकारी राजेंद्र गोकुळ हुंबे,लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक केली आहे.

मनोहर भोसले याच्याविरूध्द कुर्डूवाडी पोलीस ठाणे गुरनं 192/2026 बीएनएस 318(2), 318(4), 3(5) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट,अघोरी प्रथा व जादुटोणा यांचा प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 3(2),3(3) प्रमाणे वाढीव बीएनएस कलम 111(2) ब, इतर कलमान्वये दि.23/04/2026 रोजी गुन्हा दाखल आहे.त्याचा सविस्तर तपास सुरू आहे.

मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले याचेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर पिडीत यांनी पुढे येवून फिर्यादी दिल्याने मनोहर भोसले व त्याचे इतर साथीदार यांचेवर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण ०६ गुन्हे दाखल झाले आहेत.सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदर गुन्ह्याचे तपासाकरीता सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सदर विशेष पथकाने पथकाने कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या गुरनं 192/2026 या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 23 आरोपी निष्पन्न केले असून 10 आरोपींना अटक केले आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाणेस दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोहर भोसले याने अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा अशा अघोरी पुजेच्या माध्यमातून अनेक पिडीतांची फसवणूक करुन त्यातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसे मिळवले होते.या मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूट शिक्षण संस्था स्वामी चिंचोली,ता.दौंड जि.पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचे मार्फतीने त्याची विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांना आरोपी करण्यात आले आहे तसेच त्यांचेबरोबर त्यांच्या इन्स्टिटयूट शिक्षण संस्था मध्ये त्यांचेसोबत त्यांना मदत करणारे त्यांचे इतर साथिदारांनाही गुन्ह्यात आरोपी करुन त्यापैकी राजेंद्र गोकुळ हुंबे व लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना दि.17/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.

दत्तकला इन्स्टिटयूट शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली,दौंड पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ हा परागंदा झाला असून त्याचा शोध सुरु आहे.सदर गुन्ह्याचा तपास विशेष पथकामार्फत सुरू आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.