Maharashtra crimes

पंढरपुरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; हातभट्टीसह विदेशी दारूचा 46 हजारांचा साठा जप्त

पंढरपुरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; हातभट्टीसह विदेशी दारूचा 46 हजारांचा साठा जप्त

इंद्रप्रस्थ बिल्डिंग परिसरात लपवून ठेवली होती दारू; हातभट्टी व विदेशी दारूसह एकावर कारवाई

पंढरपूर शहरातील इंद्रप्रस्थ बिल्डिंग परिसरात अवैध हातभट्टी व विदेशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई. प्रतापसिंग ठाकूर याच्याकडून 46,470 रुपयांचा दारूसाठा जप्त.

पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑगस्ट २०२६ – आज रोजी सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी सांगितले की,पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत इंद्रप्रस्थ बिंल्डींगच्या पाठीमागे पंढरपूर ता. पंढरपूर येथे प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर हा हातभट्टी दारु व विदेशी दारुची चोरुन विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली असून सदर ठिकाणी जावून आपण कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोह/186 श्री.रोंगे ,पोकाँ/624 श्री.घायाळ यांनी वरील बातमीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता एक इसम पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्याच्या ढिगाऱ्यांखाली वेगवेळया पिशव्यांमधून हातभट्टी व विदेशी दारु बाटल्या विक्री करत असताना दिसून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारता त्यांने त्याचे नाव प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर रा.इंद्रप्रस्थ बिंल्डींगच्या पाठीमागे पंढरपूर असे सांगितले.पोलिसांनी प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्या बाजूला सारुन पाहिले असता त्याठिकाणी वेगवेगळया पिशव्यांमधुन हातभट्टी व विदेशी दारु चा माल मिळून आला आहे.


1) इमप्ररियल बिल्यू कंपनीची 180 मिली काचेच्या 20 बाँटल प्रत्येकी किं.220/-रु.प्रमाणे एकूण किंमत 2200/-
2) मँड रम कंपनीची 180 मिली ची काचेच्या 24 बाँटल प्रत्येकी किं.160/- रु.प्रमाणे एकूण किंमत 3840/-
3) राँयल चँलेज विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीकच्या 20 बाँटल प्रत्येकी किं.250/- रु.प्रमाणे एकूण 5000/-रु.


4) अल्फा बुल रम कंपनीची 180 मिली ची प्लास्टीकच्या 21 बाँटल प्रत्येकी किं 150/-रु.प्रमाणे एकूण किंमत 3150/-रु.
5) राँयल सिंग विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 14 बाँटल प्रत्येकी किं. 150/-रु प्रमाणे एकूण 2100/-रु.
6) बेलड्रर प्राईड विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 08 बाँटल प्रत्येकी किं. 380/-रु प्रमाणे एकूण 3040/-रु.
7) मास्टर डिलाईट विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीक 05 बाँटल प्रत्येकी किं.150/- रु. प्रमाणे एकूण किंमत 750/-रु.
8) क्लासिक गोल्ड विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 17 बाँटल प्रत्येकी किं.150/-रु. प्रमाणे एकूण किंमत 2550/-रु.
9) वल्कन ब्ल्यु विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 24 बाँटल प्रत्येकी किं 160/- र .प्रमाणे एकूण किंमत 3840/-रु
10) राँयल ग्रिन विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीक 24 बाँटल प्रत्येकी किं. 250/- रु.प्रमाणे एकूण किंमत 6000/- रु.
11) अंबट व उग्र वासाची हातभट्टी दारु चे 100 फुगे प्रत्येकी किं 15/- रु.प्रमाणे एकूण किंमत 1500/-
12) काळ्या रंगाची रबरी टयुबमध्ये 50 लिटर आंबट व उग्र वासाची हातभट्टी दारु प्रत्येकी लिटर 250/-रु.प्रमाणे एकूण किंमत 12500/-

एकूण किंमत 46470/-रु.चा प्रोव्हीशन माल मिळून आला आहे.सदर चा प्रोव्हीजन माल व आरोपी असे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर यांचे आदेशाने पुढील कार्यवाहीकरीता पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात दिला आहे म्हणून नोंद झाली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.