Maharashtra crimes

पंढरपूरमध्ये घरफोडीचा छडा; 12.50 तोळे सोने आणि 30 भार चांदी जप्त

पंढरपूरमध्ये घरफोडीचा छडा; 12.50 तोळे सोने आणि 30 भार चांदी जप्त

पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा चोरीचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीकडून 12.50 तोळे सोने, 30 भार चांदी आणि एकूण 17.01 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 12.50 तोळे सोन्याचे दागिणे व 30 भार चांदीचे घरफोडीत चोरी झालेले दागिने धडाकेबाज कामगिरी करत आरोपीकडुन १७ लाख १,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. 25 रोजी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याअुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत होती.पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने विशेष पथके नेमले.

पंढरपुर शहर व आजुबाजूचे सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यात आरोपी सुनिलकुमार रामसिंग राजपूत वय २६ रा.मुळग्राम बिकापुरी पोस्ट हिरापुरा भिंड मध्यप्रदेश सध्या रा. आढेगाव टेंभुर्णी ता.माढा जि. सोलापूर यास ताब्यात घेतले.दि.२७ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १२.५० तोळे सोन्याचे दागीने व ३० भार चांदीचे दागीने असे व असा एकुण १७,०१,५०० जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोसई सुप्रिया रावण,पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप,सपोफौ सुजित उबाळे, सचिन हेंबाडे,अनिल बनसोडे, अस्लम काझी,गणेश पवार,हर्षद ठाकर, शहाजी मंडले, सांवत, प्रविण मेटकरी यांनी केली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.