Maharashtra crimes सोलापूर जिल्हा

हाजापुरात धक्कादायक प्रकार; २० वर्षीय तरुणीला लोखंडी गजाने मारहाण, चौघांवर गुन्हा

हाजापुरात केस मागे घेण्यावरून तरुणीला लोखंडी गजाने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

हाजापुरात धक्कादायक प्रकार; २० वर्षीय तरुणीला लोखंडी गजाने मारहाण, चौघांवर गुन्हा

मंगळवेढा तालुक्यातील हाजापुरात पोलीस केस मागे घेण्याच्या कारणावरून २० वर्षीय तरुणीला लोखंडी गजाने मारहाण केल्याचा आरोप. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

मंगळवेढा | प्रतिनिधी, दि. १९ ऑगस्ट २०२६ : मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथे पूर्वी दाखल केलेली पोलीस केस मागे घेण्याच्या कारणावरून २० वर्षीय तरुणीला शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी शिवानी रोहित भोसले वय २०, व्यवसाय मजुरी, रा.हाजापूर, ता.मंगळवेढा या १८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता आपल्या घराजवळ बसल्या होत्या. त्यावेळी जितेंद्र दगडू काळे, संजय जंगाळ्या काळे, हाड्या दौलुशा पवार आणि आण्णा दौलुशा पवार, सर्व रा. सोमेश्वरनगर, आटपाडी, जि. सांगली हे तेथे आले.

या चौघांनी पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घ्या, असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी जितेंद्र दगडू काळे याने हातातील लोखंडी गजाने शिवानी भोसले यांच्या उजव्या पायाच्या नडगीवर, दोन्ही हातांवर तसेच डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान भांडण सुरू असताना आरडाओरड ऐकून शिवानी यांचे दीर रितेश मुकेश भोसले हे भांडण सोडविण्यासाठी घटनास्थळी आले. त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी शिवानी रोहित भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ७६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात लोखंडी गजाचा वापर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्दी रिपोर्ट संबंधित न्यायालयात पाठविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.शिंदे ब.नं.१०५४ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण, पूर्वी दाखल असलेल्या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि मारहाणीच्या घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.