Maharashtra crimes

डहाणूच्या न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार करत कोट्यवधींचे सोने लुटणारे जेरबंद;पालघर पोलिसांची धडक कारवाई

डहाणू न्यू लक्ष्मी ज्वेलर्स चोरी प्रकरण: गोळीबार करून दागिने लुटणाऱ्या ३ आरोपींना अटक, ५१ लाखांचे सोने जप्त

पालघरमधील डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये गोळीबार करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ५१.५१ लाख रुपयांचे ४२८ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.

डहाणू | पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज : डहाणू येथील इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर गोळीबार करून कोट्यवधींचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना मोठे यश आले आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे ४२८.०५० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

नेमकी घटना काय घडली ?

फिर्यादी विनय कैलास सोनी वय ४६, रा.लक्ष्मी निवास डहाणू यांच्या इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात तोंडाला काळा मास्क आणि अंगात काळे जॅकेट घातलेले २५ ते ३० वयोगटातील ३ अज्ञात आरोपी जबरदस्तीने घुसले. दुकानातील दागिने लुटत असताना फिर्यादीने त्यांना जोरदार प्रतिकार केला.यावेळी एका आरोपीने विनय सोनी यांच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली.त्यानंतर लोखंडी सुऱ्याने दुकानातील काचा फोडून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने व इमिटेशन ज्वेलरी घेऊन आरोपी फरार झाले होते.या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ सह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची तपास चक्रे आणि आरोपी अटकेत :

घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथके रवाना केली.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या: यशवंत सदू चौधरी वय ४० वर्षे रा.नवकार रेसिडेन्सी पटेलपाडा डहाणू; मूळ रा.कंकराडी डहाणू, दिपेश यशवंत गवळी वय २२ वर्षे रा.दाभोण लहांगेपाडा पो. ऐना, ता.डहाणू,विशाल धाक्या चौरे वय २३ वर्षे रा.दाभोण लहांगेपाडा, पो.ऐना ता.डहाणू

५१ लाखांचे दागिने जप्त:

अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे एकूण ५१,५१,१५०/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.या गुन्ह्यात बीएनएस कलम ६१(२) आणि २३८ ही वाढीव कलमे लावण्यात आली असून, डहाणू पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुर शेलार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सदर गुन्ह्यात दिनांक २१/०८/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६१ (२), २३८ हे वाढिव कलम लावले असून अटक आरोपीत यांचेकडे तपास करून त्यांचेकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे एकूण ५१,५१, १५०/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्ह्याचा पुढिल तपास हा सपोनि/अंकुर शेलार नेमणुक डहाणु पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची संपुर्ण कारवाई ही चंद्रकिशोर मिना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई,यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर,विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्रीमती निशा जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, स्था.गु.शा. पालघर, पोनि/जितेंद्र ठाकुर डहाणु पोलीस ठाणे, सपोनि/योगेश शिंदे, पोउनि/स्वप्नील सावंत देसाई, पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोउनि / राजेश वाघ,पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/कपिल नेमाडे, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/संतोष निकोळे, पोहवा/दिलीप जनाठे, पोहवा/मुद्दसर दांडेकर, पोना/कल्याण केंगार, पोअं/नरेश घाटाळ, पोअं/वैभव जामदार, पोअमं/प्रशांत निकम, पोअं/बजरंग अमनवाड, पोअमं/विशाल लोहार, पोअमं/विशाल कडव, पोअं/महेश अवतार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पोउपनि/समिर भोसले, पोअं/रूपेश पाटील, पोअं/रोहित तोरस्कर, पोअं/अक्षय शेट्टे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.