Maharashtra crimes

पालघरमध्ये थरार! ज्येष्ठ महिलेची जबरी चोरी; २ तासांत चार आरोपी जेरबंद,सोन्याची माळ जप्त

दोन तासांत चार आरोपी जेरबंद; जबरी चोरीतील १.६० लाखांचा सोन्याचा माळ व इको कार जप्त

चोरी करून गुजरातला पळाले, पण पोलिसांनी दोन तासांत पकडले; १.६० लाखांची सोन्याची माळ परत

पालघरच्या वाड्यात ज्येष्ठ महिलेची जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना दोन तासांत गुजरातमध्ये जेरबंद. १.६० लाखांची सोन्याची माळ व इको कार जप्त

पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज : पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात ज्येष्ठ महिलेची जबरी चोरी करून फरार झालेल्या चार आरोपींना अवघ्या दोन तासांत जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ तसेच गुन्ह्यात वापरलेली GJ-05-RS-9757 क्रमांकाची इको कार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाडा तालुक्यातील केळठणपाडा मांडा येथे फिर्यादी श्रीमती भारती भास्कर पष्टे (वय ७२) या अन्य तीन महिलांसह केळठणपाडा ते कंचाड जाण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या इको कारमधून आलेल्या संशयितांनी लक्ष्य केले.

या कारमध्ये चालकासह चार जण होते. त्यातील काही आरोपींनी अंगात काळ्या रंगाचे शर्ट, टी-शर्ट तसेच काळ्या रंगाचा गॉगल घातला होता, तर एका महिलेने मेहंदी रंगाचा ड्रेस व डोक्यात मेहंदी रंगाचा स्कार्फ परिधान केला होता, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.

आरोपींनी फिर्यादी व इतर महिलांना वाहनात बसवून काही अंतर नेले. त्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात हाताने जोराचा फटका मारून त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून घेतली आणि महिलांना रस्त्यात उतरवून आरोपी फरार झाले. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेली GJ-05-RS-9757 क्रमांकाची इको कार गुजरातच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न केले.

त्यानंतर वलसाड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वलसाड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुंदलाव ब्रिज येथे सापळा रचून संशयित इको कार ताब्यात घेण्यात आली. कारमध्ये तीन पुरुष व एक महिला आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता चारही जण संशयित असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुझम्मिल अशफाकअली उर्फ बबलूक मेहबूबअली सय्यद (वय २९), अशफाकअली उर्फ बबलूक मेहबूबअली सय्यद, सुफ़ियान नाजिम शेख (वय २२) आणि आसिफा उर्फ हिना अमजद पठाण (वय २८) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींचे गुजरातमधील सुरत, भेस्तान तसेच भावनगर परिसराशी संबंधित पत्ते असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची माळ आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त केली आहे. या कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई ही यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर,विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, समिर महेर उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर,सपोनि/योगेश शिंदे, पोउपनि/स्वप्नील सावंत देसाई, पोहवा / नरेंद्र पाटील,पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/कैलास पाटील, मपोहवा/आरती पाटील, पोअं/विशाल लोहार, पोअं/विशाल कडव, पोअं/बजरंग अमनवाड, पोअं/नरेश घाटाळ सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच पोउपनि/समिर भोसले,पोअं/महादेव सांगळे, नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर वाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.