Maharashtra crimes

पंढरपुर परिसरात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखले; १५ वर्षांच्या दोन मुलींना निर्भया पथकाने दिले संरक्षण

मंडप सजला, लग्नाची तयारी सुरू होती; निर्भया पथक पोहोचताच पंढरपुरात दोन बालविवाह थांबले

पंढरपूर ग्रामीण व तालुका पोलीस ठाणे हद्दीत ३० ऑगस्ट रोजी होणारे दोन बालविवाह निर्भया पथकाने वेळीच रोखले.दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न

पंढरपुरात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखले; निर्भया पथकाची धडाकेबाज कारवाई

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० ऑगस्ट : पंढरपूर तालुक्यात एकाच दिवशी होणारे दोन बालविवाह रोखण्यात पंढरपूर पोलिसांच्या निर्भया पथकाला यश आले आहे. पंढरपूर ग्रामीण आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही विवाह रोखले.

मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही ठिकाणी निर्भया पथकाची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी पोहोचून मुलींचे वय आणि विवाहाची तयारी याबाबत चौकशी केली.मुलींच्या नातेवाईकांनी आधारकार्ड सादर केले असता एका मुलीचे वय १४ वर्षे ११ महिने तर दुसऱ्या मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी केवळ आधारकार्डवर अवलंबून न राहता पुढील चौकशी केली.त्यामध्ये दोन्ही मुलींचे शाळा सोडल्याचे दाखले तपासण्यात आले.त्यावरही मुली अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी विवाहस्थळी उपस्थित असलेल्या मंडळींसह मुलींच्या वडिलांना बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची माहिती देत योग्य ती समज दिली.त्यानंतर दोन्ही बालविवाह थांबविण्यात आले.

अल्पवयीन मुलींना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती सोलापूर यांच्यासमक्ष हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक आणि कायदेशीर समस्येविरोधात प्रशासनाची भूमिका पुन्हा स्पष्ट झाली आहे.

निर्भया पथकाचे नागरिकांना आवाहन

पंढरपूर निर्भया पथकाने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना बालविवाह रोखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

अल्पवयीन मुलींचे बालपण आणि शिक्षण हिरावून घेऊन त्यांच्या खांद्यावर कमी वयात जबाबदाऱ्यांचे ओझे टाकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने निर्भया पथकाशी संपर्क साधावा,असेही सांगण्यात आले आहे.

बालविवाहासारखे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही निर्भया पथकाने दिला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव-रावण, पोलीस उपनिरीक्षक श्री.भोसले, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शशिकांत सावंत, श्री.वाघे, सहायक पोलीस फौजदार अरुण राजकर, पोलीस कॉन्स्टेबल श्री.काळे आणि चा.पो. कॉन्स्टेबल श्री.माळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ads

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.