सामाजिक

डॉ. वीरेंद्र भाटी मंगल यांना नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड’; पत्रकारितेतील ३५ वर्षांच्या योगदानाचा सन्मान

डॉ.वीरेंद्र भाटी मंगल यांना नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड

पत्रकारितेतील ३५ वर्षांच्या योगदानाबद्दल सन्मान; निष्पक्ष व निर्भीड संपादकीय नेतृत्वाची दखल

ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. वीरेंद्र भाटी मंगल यांना पत्रकारितेतील ३५ वर्षांच्या योगदानाबद्दल ‘नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

लाडनूं राजस्थान | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१ ऑगस्ट : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि संपादक डॉ.वीरेंद्र भाटी मंगल यांना पत्रकारिता क्षेत्रातील सातत्यपूर्ण ३५ वर्षांच्या योगदानाबद्दल नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.निष्पक्ष व निर्भीड संपादकीय नेतृत्वासह लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीची दखल घेत ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. भाटी मंगल यांनी संपादक म्हणून केलेल्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सन्मानपत्रात त्यांच्या जबाबदार पत्रकारितेच्या कार्यासह समाजाप्रती केलेल्या सेवांचेही कौतुक करण्यात आले आहे.

डॉ. भाटी मंगल यांचा दृष्टिकोन, समर्पण आणि मार्गदर्शन सध्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, आगामी पिढ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरेल, असे सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.

साहित्य आणि पत्रकारितेत प्रदीर्घ योगदान

डॉ. वीरेंद्र भाटी मंगल हे साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळा पासून सक्रिय आहेत. त्यांच्या लेखनातून सामाजिक प्रश्न, मानवी संवेदना, नैतिक मूल्ये आणि समकालीन विषयांना प्राधान्य मिळते. त्यांच्या साहित्यिक कार्यात कविता, लघुकथा, संशोधन तसेच सामाजिक विषयांवरील लेखनाचा समावेश आहे.

डॉ.वीरेंद्र भाटी मंगल यांनी दीर्घकाळ तेरापंथ टाइम्स चे संपादक म्हणून काम केले आहे. तसेच गेल्या २० वर्षांपासून ते सैनी सेतु टाइम्स चे संपादन करत आहेत.

पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मिळालेल्या या सन्मानामुळे साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. विविध साहित्यिक,पत्रकार आणि शुभचिंतकांनी डॉ.वीरेंद्र भाटी मंगल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.