Maharashtra crimes

पंढरपूर तालुक्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; १६५ बाटल्या जप्त,एकावर गुन्हा दाखल

तारापूर येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २२,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; १६५ बाटल्या जप्त,एकावर गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे अवैध देशी-विदेशी दारूविक्रीवर पोलिसांनी छापा टाकला. १६५ बाटल्या व रोख रकमेसह २२,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Tarapur crime news पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ ऑगस्ट : पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १६५ दारूच्या बाटल्या आणि रोख रकमेसह एकूण २२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दत्ता किसन साबळे वय ४२,रा.तारापूर ता.पंढरपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार मंगळवार दि.११ रोजी ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना तारापूर येथे अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले.

पोलिस हेड कॉन्स्टेबल रोंगे आणि पोलिस कॉन्स्टेबल घायाळ हे तारापूर येथील पंढरपूर-तारापूर रोडलगत पत्रा शेडच्या शेजारी असलेल्या हिरव्या शेडनेटच्या ठिकाणी गेले. तेथे दत्ता किसन साबळे हा देशी-विदेशी कंपनीची दारू विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता एका पांढऱ्या पिशवी मध्ये देशी व विदेशी दारूच्या एकूण १६५ बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत २१ हजार ५३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारूविक्रीतून मिळालेली १ हजार ४२० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली.अशा प्रकारे दारूसाठा आणि रोख रकमेसह एकूण २२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

जप्त मुद्देमाल आणि आरोपी दत्ता साबळे यास पुढील कारवाईसाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरवसे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई

तारापूर परिसरात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा अवैध दारूविक्री वर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.