पाठीमागील भांडणाचा जाब विचारल्याप्रकरणी एकास लोखंडी रॉडने केली मारहाण
गोणेवाडीत जुन्या भांडणाचा बदला;लोखंडी रॉड,चेन अन् दगडाने चौघांना मारहाण,८ जणांवर गुन्हा
मंगळवेढा|ज्ञानप्रवाह न्यूज : गोणेवाडी येथे पाठीमागील भांडणाचा राग मनात धरुन जाब विचारताच एका तरुणास मोटर सायकलच्या चेनने व लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी रोहित मासाळ, रामचंद्र मासाळ, वसंत मासाळ, रतिलाल मेटकरी, योगेश मासाळ,सुनिल मासाळ, अनिल मासाळ, मनोहर मारकर या आठ जणाविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रमेश विठ्ठल हजारे हे दि.8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता गोणेवाडी गावातील सुरेश क्षिरसागर यांच्या सलून दुकाना समोर असताना भाचा उमेश मासाळ यास पाठीमागील भांडणाच्या कारणावरुन मारहाण केल्याने सदरबाबत तू उमेश मासाळ यास मारहाण का केली असे विचारले असता आरोपींनी तू आम्हाला विचारणार कोण? असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करुन लोखंडी रॉड व चेन डोकीत घालून तसेच तोंडावर मारुन दात पाडून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान या भांडणात गळ्यातील सोन्याची एक तोळ्याची चेनही आरोपी रोहित मासाळ याने जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे या करीत आहेत.












Add Comment