Maharashtra crimes

मरवडे-येड्राव मार्गावर पोलिसांचा छापा;६० लिटर शिंदी जप्त,महिलेला घेतले ताब्यात

मरवडे-येड्राव मार्गावर पोलिसांचा छापा;६० लिटर शिंदी जप्त, महिलेला घेतले ताब्यात

पत्रा शेडच्या आडोशाला बेकायदा शिंदी विक्री; मंगळवेढा पोलिसांची कारवाई, ४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे – येड्राव मार्गावर पोलिसांची कारवाई; बेकायदा शिंदी विक्री करणाऱ्या महिलेकडून ६० लिटर शिंदी, ४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मरवडे ते येड्राव जाणाऱ्या रस्त्यालगत पत्रा शेडच्या आडोशाला बेकायदेशीरपणे शिंदीची विक्री करणाऱ्या महिलेवर मंगळवेढा पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ हजार २०० रुपये किमतीची ६० लिटर शिंदी जप्त केली असून लक्ष्मी हुसेन केंगार वय ४४, रा.परिसर हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराळे बीटमध्ये अवैध धंद्यां विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत मरवडे-येड्राव रस्त्यावर पत्रा शेडच्या बाजूला एक महिला प्लास्टिक कॅनमध्ये शिंदी बाळगून तिची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एक महिला प्लास्टिक कॅनमध्ये शिंदी बाळगून विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले.तिची चौकशी केली असता तिने आपले नाव लक्ष्मी हुसेन केंगार वय ४४ असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी ६० लिटर शिंदी, अंदाजे ४ हजार २०० रुपये किमतीची, जप्त केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर,महिला पोलीस हवालदार वंदना घोडके,पोलीस हवालदार मनोज खंडागळे आणि पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.

मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू व इतर अवैध धंद्यांविरोधात पोलिसां कडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अवैध शिंदी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.