संगमनेरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील शस्त्रक्रियेसाठी ₹20 हजार लाचेची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलचे दोन कर्मचारी ACB च्या जाळ्यात
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत लाचखोरीचा पर्दाफाश! संगमनेरमधील खासगी रुग्णालयातील दोन जणांविरुद्ध ACBचा गुन्हा
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ₹20 हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला
अहिल्यानगर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. २१ जुलै २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेसाठी लाभ देण्याच्या मोबदल्यात ₹20 हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांनी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मेडीकव्हर हॉस्पीटल, संगमनेर, जि. अहिल्यानगर मधील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कामकाज पाहणारे सुभाष धादवड यांनी दि.22/05/2025 रोजी 15/45 ते 16/04 वा. चे दरम्यान मेडीकव्हर हॉस्पीटल संगमनेर जि. अहिल्यानगर येथे लाच मागणी पडताळणी कारवाईच्या वेळी पंचाचे समक्ष तकारदार यांच्या आईचे ऑपरेशन व उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करून देणेकरीता 20,000/- रूपये दयावे लागतील व सदर पैसे दिल्याबाबतचे बिल भेटणार नाही असे सांगुन सुभाष धादवड यांनी लाच मागणी करून सदरची लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. तसेच सदरचे हॉस्पीटलचे मॅनेजर सुजित गायकवाड यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही. असे म्हणुन सुभाष धादवड यांच्या लाचमागणीस प्रोत्साहन दिले म्हणुन त्यांच्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मेडिकेअर हॉस्पिटल मधील सुभाष दगडु धादवड, वय-29 वर्षे, धंदा-डाटा इंन्द्री ऑपरेटर, मेडीकव्हर हॉस्पीटल, संगमनेर, हल्ली रा.घुलेवाडी फाटा, राजापुर रोड राउत मळा, पदमिनी हॉटेल शेजारी ता.संगमनेर जि. अहिल्यानगर व सदर हॉस्पीटलचे मॅनजेर सुजित दामोदर गायकवाड, वय-34 वर्षे, धदां ऑपरेशन मॅनेजर, मेडीकेअर हॉस्पीटल, संगमनेर, हल्ली रा.हिरा शंकर निवास वेदास हॉटेल जवळ मालवड रोड संगमनेर, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर मुळ रा.आश्वी खुर्द,ता.संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 697/2026 नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुढील तपास पोलीस अधीक्षक भारत तांगडे ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यविक्षण अधिकारी पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे ला.प्र.वि. अहिल्यानर यांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक श्रीमती छाया के देवरे ला.प्र.वि. अहिल्यानर, पोकॉ. गजानन एकनाथ गायकवाड,पोकॉ सचिन सुद्रुक, पोकॉ वैभव सुपेकर यांनी सुरू केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा.
संपर्क पत्ताः- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टि.व्ही सेंटर समोर, सावेडी, अहिल्यानगर.
संकेत स्थळ:- acbmaharashtra.gov.in
ई मेल:- spacbnashik@mahapolice.gov.in, dyspacba.nagar@gmail.com
ऑनलाईन तकारः– acbmaharashtra.net
टोल फ्री क्र.- 1064
दुरध्वनी कः- 0241-02423677
व्हॉटस अप क्रमांकः- 9930997700 / 9545031064
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर टोल फ्री क्र.- 1064
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक टोल फ्री क्र.- 1064
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव टोल फ्री क्र.- 1064
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे टोल फ्री क्र.- 1064
ताचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार टोल फ्री क्र.- 1064
संपर्क क्रमांक –
व्हॉटसअप क्रमांकः-9168641064
व्हॉटसअप क्रमांकः-9545651064
व्हॉटसअप क्रमांकः-7588661064
व्हॉटसअप क्रमांकः-7798161064
व्हॉटसअप क्रमांकः-9423541064








Add Comment